मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर

rajendra-pawar

पुणे (उपसंपादक प्रशांत महाजन) : या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करणारा प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना जाहीर झाला आहे.

 

या पुरस्काराचे वितरण दि. २४ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता प्रतिभा कॉलेज, चिंचवड येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र पवार यांचे पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे कार्याध्यक्ष संतोष सौंदरकर, अध्यक्ष गिरीष बक्षी, उपाध्यक्ष मनोज हरपळे, सचिव नितीन बोंडे, प्रशांत महाजन, मंगेश सोनकांबळे, महेश माने, श्रीकांत खरवडे, नटराज बोबडे, सुहास जगताप व सर्व कार्यकारणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here