वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रातील विविध पदवीने जोतिबा डोंगरचे सुपुत्र रवळनाथ रामचंद्र भिवदर्णे यांचा पुण्यात सन्मान

ज्योतिष-वास्तु

पन्हाळा (रिपोर्टर अनिल सांगळे) : विणकर हॉल पद्मावती, पुणे येथे ज्योतिष वास्तु विश्वसंशोधन केंद्र,पुणे च्या वतीने आयोजित तृतीय पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमामध्ये ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र,पुणे संस्थापक श्री. डॉ. उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचेकडून विविध विषयांचे अध्ययन करून या परीक्षांमध्ये श्री रवळनाथ रामचंद्र भिवदर्णे यांनी विशेष प्राविण्य मिळवले. “वास्तुशास्त्राच्या वास्तुरत्न, वास्तुभुषण या परिक्षांमध्ये विशेषश्रेणी मिळविली तसेच लोलक विद्या विशारद, अंकशास्त्र विशारद परिक्षेत विशेषश्रेणी मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन वास्तुरत्न, वास्तुभुषण, अंकशास्त्र विशारद आणि लोलकशास्त्र विशारद पदवीने श्री रवळनाथ भिवदर्णे यांना सन्मानित करण्यात आले.”

या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ज्योतिष पंडित चंद्रकांत दादा शेवाळे उपस्थित होते, तसेच टॅरोकार्ड रिडर, लेखिका अंकतज्ञ ॲड. सौ.सुनीता पागे, अखिल भारतीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर, याज्ञिकी, वेदशास्त्री अनिरुद्ध इनामदार गुरुजी, साम टिव्ही वाहिनीवरील भविष्यवेधच्या भविष्यवेत्त्या, लेखिका, ज्योतिषाचार्या सौ. अंजली पोतदार, श्रीदत्त उपासिका गुरुश्री. प्रिया मालवणकर या मान्यवर मंडळी उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील विविध भागातुन आलेल्या जवळपास १५० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. भिवदर्णे म्हणाले की, यापुढेही वास्तु अलंकार, विद्या वाचस्पती, ज्योतिष शास्त्र असे सर्व अभ्यासक्रम पुर्ण करून या महानशास्त्राच्या माध्यमातुन ” लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी अखंडित कार्य करीत राहण्याचा तसेच या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. मागील वर्षी यांना “वास्तु विशारद” या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here