जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असणाऱ्या व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जनमत प्रतिष्ठान कडून 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त रिटायर फौजी कर्नल, शिपाई पोलीस, यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले, तसेच covid-19 योद्धा चे प्रमाणपत्र व सन्मानपत्र तालुका पोलीस स्टेशन व रामानंद पोलीस स्टेशन यांना सुद्धा देण्यात आले, त्याप्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे महामंत्री दीपक भाऊ दाभाडे,,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले शिक्षक भारती अध्यक्ष शितल ताई जडे राहुल भाऊ लोखंडे सेवाश्रम फाउंडेशनचे विवेक ठाकरे, हर्षाली पाटील, कुणाल जडे, प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक विजय पाटील,प्रवीण कोलते,पोलीस स्टेशनचे राजेश पाटील सर प्रफुल धांडे एपीआय राऊत सर उपस्थित होते.









