ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचा पाठपुरावा यशस्वी
अलिबाग-सोगावकर – कोरोना प्रादुर्भाव त्यामुळे झालेले लॉकडाऊन यामुळे एस.टी वाहतुकीवर परिणाम झाला. याचा फटका जल वाहतुकीवर असलेल्या एस.टी च्या संलग्न सेवेवर झाला, मात्र ही बंद असलेली सेवा ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या अभ्यासपूर्व पाठपुराव्यामुळे दिनांक १७ ऑगस्ट पासून प्रत्यक्षात येत आहे. अलिबाग एस.टी आगार प्रमुख अजय वनारसे,ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल,व असोसिएशनचे अलिबाग तालुका प्रमुख विकास पाटील व पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सध्या रेवस-मुंबई लॉन्च वाहतूक बंद आहे, मात्र रेवस-करंजा तर सेवेद्वारा जल वाहतूक सुरू आहे.दिनांक १७ ऑगस्ट पासून तर सेवेचे दिवसभराचे वेळापत्रक सुरू होणार आहे.
तर सेवेला पर्यायाने जल वाहतुकीला प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी ची संलग्न सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्षात भेटून केली होती. त्याला एस.टी रायगड विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी नुकतीच मान्यता दिली होती.
त्या अनुषंगाने रेवस-अलिबाग मार्गावर खालील सेवा सुरू होत आहेत,
अलिबाग रेवस सरळमार्गे
अलिबाग-रेवस सकाळी ६:४५ वा.
रेवस-अलिबाग पहिली सेवा सकाळी ८ वा.
अलिबाग-रेवस सकाळी १०:३० वा.
रेवस-अलिबाग ११:४५ वा.
अलिबाग-रेवस दुपारी १२:०० वा.
रेवस-अलिबाग दुपारी १३:४५ वा.
अलिबाग-रेवस दुपारी १४:०० वा.
रेवस-अलिबाग दुपारी १५:१५ वा.
अलिबाग-रेवस सायं १७:०० वा.
रेवस-अलिबाग सायं १८:१५ वा.
अलिबाग-हाशिवरे-रेवस मार्गावरील सेवा
अलिबाग-हाशिवरे-रेवस सकाळी ७:१५ वा.
रेवस-हाशिवरे-अलिबाग सकाळी ८:४५ वा.
अलिबाग-हाशिवरे-रेवस दुपारी २:४५ वा.
रेवस-हाशिवरे-अलिबाग सायं. १६:०० वा.
अलिबाग-हाशिवरे-रेवस दुपारी १५:४५ वा.
रेवस-हाशिवरे-अलिबाग सायं. १७:००
याजबरोबर जसजशी प्रवासी संख्या वाढेल तसतशा या मार्गावर सेवा वाढविण्याचे आगार व्यवस्थापक श्री.वनारसे यांनी मान्य केले आहे.
कोरोनाच्या प्रादुभावामुळे उद्भवलेल्या संकटात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तर बरोबरच एस.टी.त देखील सॅनिटायझर व आवश्यक त्या सोयी सुविधांचे प्रयोजन करणे असेही ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल व तालुका प्रमुख विकास पाटील यांनी संबंधित यंत्रणांना सांगितले आहे.
प्रवासी वर्गाने सोशल डिस्टनसिंग पाळून या सेवांचा लाभ घ्यावा,असेही आवाहन असोसिएशनच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.







