एक सरपंच ग्रामस्थांच्या सहकार्याने काय करू शकतो, याची प्रचिती आली.- आमदार रोहित पवार

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – काल (दि.१५) आदर्शगाव हिवरेबाजारला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील विविध विकासकामे व नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.
सरपंच पोपटराव पावर यांनी गावातील विकाकामांची आणि उपक्रमांची माहिती दिली. बंधारे, वृक्षराजी, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामसंसद हे सगळं पाहिल्यानंतर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, एक सरपंच ग्रामस्थांच्या सहकार्याने काय करू शकतो, याची प्रचिती आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here