मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – ईशान्य मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील, रायगड चौकात जय साई मंडळाच्या वतीने शनिवारी, दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी ७४ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम सामाजिक भान राखत सुरक्षित अंतर ठेवत आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमास मनपा गटनेत्या राखी जाधव, चित्रपट सेनेचे चिटणीस भूषण चव्हाण, पत्रकार सचिन भांगे, युवासेनेचे आदेश दरेकर, रवि जाधव इत्यादी प्रमूख पाहुण्यांसह मंडळाचे संतोष कदम, विराज ठुकरुल, यशवंत करंजे, विकास बने, प्रविण गोळे, प्रसाद ठुकरुल इत्यादी मान्यवर सर्व उपस्थित होते. तसेच राखी दिदी जाधव, भुषण चव्हाण यांनी सर्व उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन ही केले.








