मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – श्री. संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा. महाराष्ट्र या
संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील मुला – मुलींना शैक्षणिक साहित्याचे म्हणजेच ऑनलाइन शिक्षणासाठी आँनड्राईड मोबाईल, टॅब, लॅपटॉप व इतर साहित्याचे वाटप हे कोरोना कोविड – १९ या गंभीर परिस्थितीत सर्व शासकीय नियमाचे पालन करूनच सातारा जिल्ह्यातील डिस्कळ, चिमणगाव, कुडाळ या गावात वाटप करण्यात आले आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आँनड्राईड मोबाईलची मागणी पालकांकडून वाढू लागली व त्या प्रमाणे वितरण केले गेले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम पडगे, महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष पोपटराव गवळी, उपाध्यक्ष विठ्ठलराव क्षीरसागर, महिला अध्यक्ष सौ. सुरेखा हाडके, सचिव नामदेवराव झगडे, खजिनदार रमेश पवार, संजय शेडगे, पोपटराव भोज, अनिल बेंद्रे, सौ. प्रिया गंधाले, प्रदीप देशमाने, नितीन देशमाने, संजय भोज इत्यादी मान्यवर तसेच लाभार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक ही उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील मुला – मुलींच्या शैक्षणिक व अर्थिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करूनच या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. असे महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष गवळी यांनी यावेळी सांगितले.
तेली समाजाचा सर्वांगीण विकास झालेला पाहिजे असेल, तर मुला मुलींचा शैक्षणिक स्तर उंचावला पाहिजे. यावेळी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व संस्थेचे धन्यवाद मानले. यासाठी आपला सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. जेणे करून आम्हीं जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहच शकू. असे मत संस्थेचे अध्यक्ष राम पडगे यांनी व्यक्त करून आपल्या भावना ही स्पष्ट केल्या. गणेश भिसे, विवेक चिंचकर, शारदा किर्वे, अनिल किर्वे, राजेंद्र किर्वे तसेच धोत्रे, दळवी, शेडगे, देशमाने, चिंचकर, चव्हाण आणि अध्यक्ष उपाध्यक्ष कुडाळ तेली समाज, अध्यक्ष उपाध्यक्ष वाई शहर व तालूका यांची ही हजेरी यावेळी दिसून आली.







