मुंबईत डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार; बदनामीची भीती दाखवून उकळले १ कोटी

rape
file photo

ठाणे (महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : सोशल मीडियावरून ओळख करत डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (दि.२१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बदनामीची भीती दाखवून विवाहित प्रियकराने आतापर्यंत १ कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती विवाहित असून एक मुलगी असल्याचे त्याला माहीत होते. लग्नाचे अमिष देऊन त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर दोघांच्या संबंधाविषयीची माहिती नातेवाईक, मित्रमंडळींना देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या धमकीनंतर त्याने तिच्याकडून १ कोटी रुपये उकळले होते. याच दरम्यान तिला अवैझ हा विवाहित असून त्याने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here