नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : राज्यात अपघातांचं सत्र चालूच आहे. सायन पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या दिशेने जाताना अर्टिगा कारची पाठीमागून डंपरला जोरदार धडक दिली. या अपघाता अर्टिगाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.







