भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय व्यक्ती ठार

accident
file photo

नाशिक (क्राइम रिपोर्टर कुबेर जाधव) : भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय व्यक्ती ठार झाला. हा अपघात गेल्या गुरूवारी (दि.३) वंजारवाडी (ता.इगतपूरी) शिवारात झाला होता. एसएमबीटी रूग्णालयात जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू होते. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

बाळू विष्णू मते (रा.मुरंबी ता.इगतपुरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मते गुरूवारी सकाळी मुरंबी कडून वंजारवाडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. वंजारवाडी शिवारात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

 

मुलगा विक्रम मते यांनी त्यांना तात्काळ अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. अधिक उपचारार्थ त्यांना इगतपुरी येथील एसएमबीटी रूग्णालयात हलविले असता मंगळवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here