दारुड्या वाहनचालकाने नाकाबंदीत पोलिसांना केली धक्काबुक्की

police-marhan
file photo

पुणे (उपसंपादक प्रशांत महाजन) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाते. पुण्यात नाकाबंदी लावली असताना दारु पिऊन वाहन चालविणार्‍या दारुड्या वाहनचालकास थांबविल्यावर त्याने पोलिसांना धक्काबुक्की करुन पोलिसांचा मोबाईल हिसकावून घेतला.

 

याबाबत पोलीस अंमलदार संदीप हिरामण खंडागळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिराग राजेंद्र मुंदडा (वय २९, रा. नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कल्याणीनगर येथील बिशप स्कुलजवळ शनिवारी पहाटे २ वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी हे नाकाबंदीत वाहन तपासणीचे काम करत होते. त्यावेळी चिराग मुंदडा हे दारु पिऊन वाहन चालवत नाकाबंदीच्या ठिकाणी आले. त्यांना थांबविले असता त्यांनी फिर्यादी यांना सरकारी काम करु न देता त्यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी यांना हाताने धक्का मारुन फिर्यादीचा मोबाईल हातातून घेऊन अडथळा निर्माण केला. दारु पिऊन वाहन चालविल्याबद्दल मुंदडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक लामखडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here