नायजेरियामध्ये इंधन तेलाला आग लागून स्फोट; १४७ जणांचा जळून अंत

tanker-blast-in-naigiria
File Phot

अबुजा (नायजेरिया) (वृत्तसंस्था) : इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाल्याची घटना नायजेरियात घडली आहे. टँकरला अपघात झाल्यानंतर आसपासच्या भागातील लोक इंधन चोरण्यासाठी जमले. टँकरमधून वाहून जाणारं इंधन ते गोळा करत होते. तितक्यात इंधनाच्या टँकरचा स्फोट झाला. त्यात १४७ जणांचा मृत्यू झाला. घटना उत्तर नायजेरियात घडली. स्फोटात जखमी झालेल्यांनैा जवळच्या रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक रहिवासी टँकरमधून सांडलेलं इंधन गोळा करतेवेळी स्फोट झाल्याची माहिती आपत्कालीन सेवा विभागाकडून देण्यात आली.

 

स्थानिक पोलीस प्रवक्ते लॉन ऍडम यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची घटना मध्यरात्रीच्या सुमारास जिगावा राज्यातील माजिया नगर परिसरात घडली. राज्यमार्गावर धावत असलेल्या टँकर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे टँकर उलटला. यानंतर मोठ्या प्रमाणात इंधन गळती सुरु झाली. स्थानिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इंधन गोळा करण्यात सुरुवात केली. त्याचवेळी आग भडकली. पुढच्या काही सेकंदांमध्ये मोठा स्फोट झाला.

 

टँकरच्या स्फोटात १४७ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सामूहिकपणे दफन करण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख नुरा अब्दुल्लाही यांनी ‘असोशिएट प्रेस’ला दिली. या घटनेनं माजिया परिसरावर शोककळा पसरली असून स्थानिकांनी मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले, असं अब्दुल्लाही यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here