खेड शिवापूर टोल नाक्यावर एक कोटीपेक्षा जास्तीचा अवैध गुटखा ट्रकसह जप्त, ट्रकसह २ जण ताब्यात

crime
file photo

पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी पहाटे एक कोटी पाच लाख रूपयांचा अवैध गुटखा ट्रक सह जप्त करण्यात आला आहे.

 

रविवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रकसह २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ट्रक (क्रमांक एम. एच. ०५ डी. के. ८१६७) या वाहनात विमल पानमसाल्याच्या २०२ पोत्यांचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत तब्बल एक कोटी ५ लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजावरून सांगण्यात आलं आहे.

 

राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर पहाटे आला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.रविवारी पहाटे राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रकसह २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here