जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मगम परिसरात दोघा कामगारांवर गोळीबार करण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दोघा बिगर काश्मिरी कामगारांवर गोळीबार केला. या घटनेनंतर सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांनी ज्या कामगारांवर गोळीबार केला ते उत्तर प्रदेशमधील साहनपूरमधील आहेत. उस्मान मलिक आणि सुफिया यांना गोळी लागली आहे. उस्मानच्या डाव्या हाताला तर सुफियानच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. हे दोघेही जल शक्ती विभागात काम करत होते. गोळीबारात हे दोघे जण जखमी झाले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांवर जेव्हीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Security heightened in Jammu and Kashmir's Mazhama, in the Magam area of Budgam district where terrorists fired upon two non-locals.
The injured were immediately shifted to a nearby hospital for treatment, where their condition is said to be stable. The whole area was… pic.twitter.com/a14b03QNdu
— ANI (@ANI) November 1, 2024
बिगर काश्मिरी कामगारांवर गोळीबार होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेकवेळा अशा प्रकारे राज्यातील बाहेरच्या कामगारांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. गेल्या आठवड्यात बटागुंड त्राल येथे झालेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला होता. गेल्या काही दिवसात झालेली ही तिसरी घटना आहे. आजच्या घटनेसह एकूण चार घटना होतात ज्यामध्ये दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी लोकांना टार्गेट केले असेल.गेल्या वर्षी देखील राज्यातील विविध भागात बिगर काश्मिरी लोकांची हत्या करण्यात आली होती. अनंतनाग, पुलवामा, पुंछ येथे टार्गेट किलिंगच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.







