समोरासमोर धडकल्याने एस.टी. बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

ST-accident

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्ह्यात दोन बस समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला असून यात २५ ते २७ प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

जळगावच्या कन्नड- चाळीसगाव बायपास हायवेवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर धडकली. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले. या अपघातात धुळे व कन्नड डेपोच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती करू शकली नाही.

 

अपघात झालेल्या दोन्ही बसमध्ये प्रवासी होते. यात एका बसच्या वाहकाकडील बाजू दाबली गेल्याने त्या बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here