महिला असुरक्षितच : महाराष्ट्रातून तब्बल ६४ हजार मुली बेपत्ता – शरद पवार

sharad-pawar

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : एकेकाळी महाराष्ट्र हे सुसंस्कृत व सुरक्षित राज्य होते. सध्या राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तब्बल ६४ हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, याचा अंदाज येतो, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. काल (दि.६) मुंबईतील बीकेसीत महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रचार सभेला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पटोले, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्या उभारणीतही भ्रष्टाचार झाला. गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. समोर समुद्र असूनही त्या पुतळ्याला आजपर्यंत कसलाही धक्का लागलेला नाही. पण सिंधुदुर्गतील पुतळ्याचे देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले आणि तो पुतळा उद्धवस्त झाला. सरकारकडून मात्र वाऱ्याने पुतळा उद्धवस्त झाला असं कारण देण्यात आलं. मात्र खरं सांगायचं झालं तर मुंबईतील पुतळे वाऱ्याने उद्धवस्त होत नाहीत. कारण तिथे भ्रष्टाचार नाही. राजकोटमधील पुतळ्यात भ्रष्टाचाराचा विक्रम या सरकारने केले त्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान झाला, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

केवळ धारावीच नाही तर संपूर्ण मुंबई अदाणींच्या घशात घालणारे जीआर निघाले. हे जीआर फेक नरेटीव्ह असतील तर? एक धारावी वसवण्यासाठी मुंबईतील २० जागा अदाणींच्या घशात घातल्या जात आहेत. म्हणजे मुंबई संपूर्णपणे अदाणीमय करून टाकायची आहे की काय? असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास या निविदा आम्ही रद्द करू आणि धारावीकरांना तिथल्या तिथे उद्योग आणि घरे दिल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

 

महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. त्यात विमान बनवणारी कंपनी बोईंग युनीट, अॅपल आयफोन कंपनी, महाराष्ट्राच्या हातून हिरावून घेतले गेले आणि गुजरातल नेले. या प्रकल्पांमधून ५ लाख रोजगार निर्माण होणार होते. सेमी कन्डक्टर प्लान्ट, आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट, गेल पेट्रो केमिकल प्रोजेक्ट, टाटा एअर बस प्रोजेक्ट, हे सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या, तरुणांच्या हक्काचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here