हैद्राबाद (आंध्रप्रदेश) : तीन नराधमांनी एका वृद्ध महिलेला काम देण्याच्या बहाण्याने आपल्या वासनेची शिकार बनवले. तिन्ही आरोपींनी महिलेला एका खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. आरोपींनी महिलेलाही मारहाण केली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांनी या महिलेल्या घरकामासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले. घरी कपडे धुवायचे आणि घर सापसफाई करायचं असं सांगून ५० वर्षीय महिलेवर तिघांनी मिळून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हैदराबादमधील मधुरा नगरमध्ये ५० वर्षीय पीडित महिला सोमवारी हायटेक सिटी एक्स रोडजवळील बस स्टॉपवर उभी होती. तेव्हा एका ऑटोमधील तीन लोक तिच्याजवळ आले.त्यांनी तिला त्यांच्या घरी कपडे धुण्यासाठी 500 रुपये देऊ केले.जेव्हा ती कामासाठी तयार झाली तेव्हा त्यांनी तिला ऑटोमध्ये तिच्या खोलीत नेले. तेथे पोहोचल्यावर आरोपींनी पीडितेला कपडे धुण्यास सांगितले. ती महिला कपडे धुवत असताना, तिघांनी मिळून दरवाजा बंद केला अन् त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपींने तिला थांबवले आणि बळाचा वापर करून गप्प केले. महिलेने शेजाऱ्यांकडे मदत मागितली असता आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. सोमवारी रात्री पीडितेच्या तक्रारीवरून मधुरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेसाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून हैदराबादला आले होते.
महिलेने विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला मारहाणही केली. त्यामुळे महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. चित्रकार म्हणून काम करणारे तिघे आरोपी एक महिन्यापूर्वी हैदराबादला आले होते आणि त्यांनी एक खोली भाड्याने घेतली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सामुहिक बलात्कारासह अन्य गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी येथील ‘भरोसा’ मदत केंद्रात नेण्यात आले आहे.







