मुंबई पुणे एक्स्प्रेसवर उभ्या ट्रकवर आदळून खाजगी बसचा भीषण अपघात

accident
file photo

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला.

 

मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर खासगी बस आदळली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक पोलीस मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

अपघातग्रस्त बसमध्ये कोल्हापूर येथे फुटबॉल ट्रॉफी जिंकून परतणारी टीम होती. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या टीममधील चार मुलींना एमजीएम हॉस्पिटल येथे शिफ्ट केले आहे. उर्वरित सर्वांना मुंबई येथे पर्यायी वाहनाने पाठवण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here