सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : आ. एकनाथराव खडसे यांनी गावागावांना डांबरी रस्त्याने जोडले प्रत्येक गावात मुलभूत सुविधांचे निर्माण केले. मतदासंघाचा विकास केला तरी विरोधक गेल्या तीस वर्षात काय केले हे विचारत आहेत. विरोधी उमेदवार गावात जाऊन ज्या सभागृहात छोटेखानी सभा घेत आहेत तेसुद्धा एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून झाल्याचे विसरतात आणि तीस वर्षात काय केल्याचे विचारतात. महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या मतदार संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांशी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील संवाद साधत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी तापी नदीवर हतनूर, पिंप्री नांदू पुलांची निर्मिती केली त्यामुळे मुक्ताईनगर आणि रावेर तालुके जवळ आले एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालीत काही विकास कामे राहिले असली तरी ते पूर्ण करण्यासाठी रोहिणी खडसे या सक्षम असून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी केले.
यावेळी माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष किशोर पाटिल,शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अविनाश पाटील, सौ.शारदाताई खडसे चौधरी, मनोज खैरनार, मधुकर पाटील, नितीन पाटील, श्रीकांत चौधरी,शशांक पाटील, रविंद्र महाजन,सचिन महाले, राहुल फेगडे, शांताराम पाटील, दुष्यांत पाटील, ललित पाटिल, बंटी चौधरी, पांडुरंग झांबरे, भागवत कोळी,गजानन कांडेले, जयवंत राजपूत, रविंद्र पाटील,गणेश देवगिरीकर,गफ्फुर कोळी,कमलेश भारंबे,संतोष वाघ,चेतन पाटील,आकाश पाटील,रोहन चऱ्हाटे , चेतन पाटील, संजय पाटील, केतन पाटील, भागवत कोळी, अश्विन तायडे, सिद्धार्थ तायडे, संजय पाटील, गुणवंत पाटील, प्रकाश पाटील, भूषण कोळी, नितीन पाटील, आकाश पाटील, राजू कोळी, ब्रिजलाल कोळी, राहुल चौधरी, समाधान कोळी, विजय पाटील, ईश्वर चौधरी, हर्षल पाटील,भगवान सावळे, गोकुळ कोळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







