मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत आले आहेत. तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेराव घेतला आहे.
विनोद तावडे यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत ५ कोटी रुपये सापडल्याचा आरोप हितेंद्र ठाकूरांनी केला आहे. तावडे यांच्याकडे सापडलेल्या काही डायऱ्यांमध्ये पैशांच्या नोंदी आहेत. तो आकडा १५ कोटी रुपयांच्या घरात जातो, असा ठाकूर यांचा दावा आहे. वसई रोड ५, विरार पश्चिम ४ आणि नालासोपारा ५ अशा नोंदी ठाकूर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवल्या आहेत.
विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती मला भाजपवाल्यांनी दिली होती. मला वाटलं राष्ट्रीय स्तरावरील नेता अशा लहानसहान गोष्टी करणार नाही. पण आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो, तर इथे तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, अशी खळबळजनक माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. इतक्या मोठ्या नेत्याला लाज, शरम काही नाही. मतदारसंघ ४८ तासांआधी सोडायचा असतो. इतकी साधी माहिती यांना नाही आणि हे शिक्षण मंत्री होते, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.
डायरीतील पानांवर कोणाची नावं?
शिल्पा शर्मा ३००
टीना जैन ३००
पूर्णिमा पुजारी ३००
रेणू सोळंकी ३००
अश्विनी कांबळे ३००
हिरा पांचाळ ३००
ममता कांबळे २००
प्राची बंगाळे ३००
प्रतिक राठोड ३००
अजयसिंह ५००
अनिल भोळे ५००
प्रेम घरात ५००
खुशबू कनोजिया ५००
कशिश गुप्ता ३००
शुभम शर्मा ३००
रिशभ जैन ३००
हेतल मिस्त्री ३००







