पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? विनोद तावडे प्रकरणी सुषमा अंधारेंचा टोला

सुषमा अंधारे

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये तब्बल चार तास विनोद तावडे अडकून पडले होते. यावर बोलतांना भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी डिवचलं.

 

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हॉटेलला गराडा घातला. त्यानंतर हॉटेलमधील एका बॅगमध्ये नऊ लाखांची कॅश आढळून आली आहे. विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील पैसे वाटल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता तावडेंवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी सर्वात मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे भाजपमधील एका मित्रानेच टीप दिल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता तावडेंचा ठरवून गेम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच याचाच धागा पकडत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले आहे.

https://twitter.com/andharesushama/status/1858825029556813906

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी डिवचलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून भाजप नेत्यांवर धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर बोलताना, गृहखात्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. विनोद तावडे यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याने भविष्यात ते डोईजड होतील या भीतीमधूनच ही कारवाई करण्यात आली. त्यांना या प्रकरणामध्ये पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं आहे. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here