एरंडोल (प्रतिनिधी वाल्मिक सोनवणे) : वंचित बहुजन आघाडी एरंडोल तालुकाकडून कुठल्याही इतर पक्षाच्या वा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, असे प्रतिपादन एरंडोल तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष वाल्मिक सोनवणे यांनी केले.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, एरंडोल तालुक्यातील मतदार बंधू भगिनी, तालुका पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी मी हे सांगत असून, काही उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा असल्याचे सांगून आपल्या पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत तसेच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. तरी अशा उमेदवारांवर निवडणूक आयोगाकडे आम्ही रितसर तक्रार नोंदविणार आहोत.







