शिंपी समाजाचा आमदार राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

राजूमामा भोळे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार माननीय सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांना विधानसभा निवडणूक २०२४ साठी जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्था संत नामदेव महाराज संस्कार फौंडेशन मेहरून शिंपी समाज दादा वाडी पिंपळा शिंपी समाज संत नामदेव महाराज संस्था अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ व जळगाव शहरातील सर्व सहयोगी संस्थेच्या माध्यमातून आज बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे.

 

या पाठिंबाप्रसंगी माजी समाजाध्यक्ष मुकुंद मेटकर, राज्य संघटक मनोज भांडारकर, संजय जगताप, प्रदीप शिंपी, प्रमोद शिंपी, ऋषिकेश शिंपी, चेतन पवार, अशोक सोनवणे, मयूर शिंपी, किरण सोनवणे, पप्पू जगताप, राजेंद्र सोनवणे, संजय अहिरराव, किशोर शिंपी, केतन मेटकर, विकास जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here