नाशिक येथे शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याकडून २ कोटी जप्त

5-core-seized-in-nashik

नाशिक (प्रतिनिधी) : एकीकडे विधानसभा जाहीर प्रचार काल संपलेला आहे. मात्र सर्वच उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरु आहे.यात महत्वाचे म्हणजे आर्थिक देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची लक्षात घेता, निवडणुक आयोगाने आपली करडी नजर सर्वत्र ठेवली आहे. आज येथील नामांकित हॉटेलच्या रुममधून दोन कोटीहून अधिक रक्कम जप्त केल्याने, शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

नाशिक शहरात नामांकित असलेलं हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला. त्यात शिवसेना शिंदे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख जयंत साठे, पक्ष निरीक्षक ललित वानखेडे यांच्या रूम नंबर ७०७ मध्ये ही पाच कोटींची रक्कम आढळून आली आहे. याच रूममधून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्याठिकाणी नाशिक शहरातील शिवसेना शिंदे गटाचे आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी देखील उपस्थित होते.

 

या हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे २ खोल्या बूक होत्या. छाप्यादरम्यान एका काळ्या रंगाच्या कारमध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या. पाच कोटींपैकी २ कोटी जप्त केले असून, उर्वरित पैशांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here