ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : आज (दि.२५) सकाळी ११:१४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे जवाहरबाग अग्निशमन केंद्राद्वारे प्राप्त माहितीनुसार बाबा फालूदा समोर, तलावपाळी, ठाणे (प.) या ठिकाणी नौका विहार जवळ तलावामध्ये अज्ञात व्यक्तीचा (पु./ अंदाजे वय-५५ ते ६० वर्षे) मृतदेह आढळून आला होता.
सदर घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी ०१-रुग्णवाहिकेसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित होते. तलावामधील मृतदेह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने तलावामधून बाहेर काढून, पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर व्यक्तीचा मृतदेह नौपाडा पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आला आहे.







