नवीन थार खरेदीच्या आनंदात तरुणाचा हवेत गोळीबार

gun-fire-in-mp

इंदौर (मध्यप्रदेश) : राज्यातील एका तरुणानेने काही दिवसांपूर्वी नवीन वाहन खरेदी केल्याचा आनंदोत्सव साजरा करतांना थोडा अतिरेक करत, चक्क शोरुमच्या बाहेर गोळीबार करुन केला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कारण नवीन महिंद्रा थार खरेदी केल्याचा आनंद त्याने मित्रांसह साजरा केला तो खऱ्या बंदूकीने हवेत गोळीबार करून. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. १८ नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

महिंद्रा शोरूमच्या बाहेर चित्रित केलेल्या व्हायरल फुटेजमध्ये, एक व्यक्ती आपल्या नवीन, सजवलेल्या थारमध्ये हातात बंदूक घेऊन काही मित्रांसह उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो हातातील बंदूक हवेत उंचावतो आणि सलग गोळीबार करतो. वाहनात असलेले इतर लोक त्याच्या कृत्याला प्रोत्साहन देतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here