नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाणमध्ये सायंकाळी कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २५ ते ३० फुट नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक स्त्री आणि एका पुरुषाचा समावेश आहे. कारचा पुर्णत: चक्काचूर झाला. दरम्यान, तेथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली तसेच पोलिसही तेथे तात्काळ दाखल झाले होते.
मुंबई गोवा महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून सुमारे २५ ते ३० फूट खोल नदीत खाली कोसळून झालेल्या अपघातात एक महिला व पुरुष जागीच ठार झाल्याची घटना व्हावी दिवाळी गावच्या हद्दीत घडली. भरधाव येणारी कर नदीवरील पुलाच्या कठड्याला ठोकून हा कटडा तुटून जोरदार पुलात आढळली. त्यावेळी गाडीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर तीन कि.मी अंतरावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत २५ नोव्हेंबर संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी (क्रमांक एम एच १६ बी एच ४८२९) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चकाचुर झाला आहे. या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर या दोघांचा समावेश असून ते मुंबईतील अँटॉप हिल येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. नदीत कोसळलेल्या मारुती कारला ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने वरती काढण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या कार चालकाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले.







