तळोदा ( मिलिंद निकम) तालुक्यातील बोरद येथे ७४ वा स्वतंत्र दिवस covid -19 चे सर्व नियम पाळून मास्क बाधून ग्रामपंचायत कार्यालयात बोरद येथील प्रगतिशील शेतकरी व बोरद वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन सोमनाथ पुना चौधरी यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच वासंती बाई ठाकरे, उपसरपंच रंजनकोर राजपूत ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील, पं.स. सदस्य विजय राणा, माजी सभापती नरहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, शांतीलाल पवार, तुलसीदास पाटील, लीलूबाई पवार, सुबाबाई ठाकरे, सीताराम ठाकरे, दत्तात्रेय पाटील, कृष्णदास पाटील, किशोर राजपूत, जगदीश चौधरी व आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा नं.१ व २ मधील मुख्याध्यापका सह सर्व शिक्षक वर्ग तसेच अंगवाडी सेविका व मदतनीस आणि तलाठी पी.बी. चौरे, मंडळ अधिकारी माया मराठे, पोलिस पाटील व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरद विकास सोसायटीत चेअरमन कृष्णदास पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन किशोर राजपूत, संचालक दत्तात्रेय पाटील, नथेसिंग राजपूत व सर्व संचालक मंडळ, सचिव व सभासद वर्ग उपस्थित होते.
बोरद येथे मॉर्डन इंग्लिश स्कूल मध्ये माजी सरपंच सुकलाल ठाकरे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संचालक दत्तात्रेय पाटील, मुख्याध्यापक सुर्यवंशी सर व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग सह इत्यादी उपस्थित होते.
तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी माया मराठे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तलाठी पी.बी. चौरे, कोतवाल सोनू कुवर, व पोलिस पाटील भावराव धोडरे इत्यादी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये निवृत्त सिव्हिल इंजीनिअर जगदीश चौधरी, मुख्याध्यापक आरिफ शेख सर्व शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, कालूसिंग पवार, तुलसीदास पाटील सह शिक्षकवर्ग उपस्थित होते.
जिल्हा परिषद कन्या शाळा नंबर २ मध्ये
बोरद वि.का. व्हा. चेअरमन किशोर राजपूत यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मोठे गुरुजी व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. प्रथमच विद्यार्थीविना ध्वजारोहण करण्यात आले. बोरद पोलिसदुर क्षेत्रात सरपंच वासंती बाई ठाकरे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोरद दुरक्षेत्र सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.







