वर्धा जिल्हा अकाऊंटंट संघाच्यावतीने स्वातंत्रदिनी वृक्षारोपण

वर्धा (विदर्भ संपादक ॲड. चद्रकांत कराळे) – वर्धा जिल्हा अकाऊंटंट संघाच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने आय.टी. आय. टेकडी ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स वर्धा येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी वर्धा जिल्हा अकाऊंटंट संघांचे अध्यक्ष मदनजी साबळे, सचिव हेमंतजी भुतडा, कोषाध्यक्ष रविंद्रजी येऊलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधरजी बेलखोडे यांनी ऑक्सिजन पार्क वरील विविध वृक्षांची व उपक्रमाची माहिती दिली. तसेच कॅ. प्रितेश विनोद वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा ऑक्सिजन पार्क परिसरात कुसुम या वृक्षांचे वृक्षारोपण केले. यावेळी वर्धा जिल्हा अकाऊंटंट संघाचे श्री सत्यनारायणजी तंगीराल, साकेतजी बागडोदिया , संदीपजी भुते, गौरवजी हरनुटीया, मंगेशजी कापटे,पंकजजी जाधव, मारोतीजी राऊत, रिगनजी जोसेफ, शंकरजी चिमोटे, हेमंतजी घिमे, मोहनजी साहू, रवींद्रजी साटूनकर, दीपकजी उंबरकर, पवनजी चरडे,, पंकजजी पवनारकर, दिलीपजी द्रोण, अनिलजी काळे, अमरजी डोलीया, गोविंदजी शाह, दीपकजी कांबळे, प्रणवजी ठकरे, अजितजी गावंडे, श्री येंडे सुभाष ढोबळे, विनोद वाघ, सौ. चंदा वाघ, मनोज डेकाटे, सागर मसराम आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक श्री बेलखोडे यांनी केले, बा. दे. हांडे दादा यांनी संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रितेश निमसडे यांनी केले तर आभार प्रमोद खोडे यांनी मानले. राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here