मुंबई (प्रमिला जाधव) – शिवसेना शाखा क्र.२०५ काळाचौकी शाखेच्या वतीने शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी शिवसेना उपनेते,खासदार, माजी केंद्रीय मंत्री मा.श्री.अरविंदजी सावंत यांचा शिवसेना सदस्य नोंदणीचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवसैनिक हा नेहमीच सामाजिक कार्यासाठी सज्ज असतो. कोरोनाच्या महामारीत शिवसैनिकांनी रुग्णांना केलेली मदत फार वाखाण्याजोगी आहे. शिवसैनिक हे पद एखाद्या आमदार, खासदार पेक्षा ही मोठे असून त्याची खुद्द पोचपावती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. तरी मी विभागातील नागरिकांना शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारण्याचे आवाहन शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी केले आहे. या समारंभात उपविभागप्रमुख गजानन चव्हाण महिला उपविभागप्रमुख रुपाली चांदे नगरसेवक-दत्ताराम पोंगडे, जयेश मेहता, पुरुष व महिला उपशाखाप्रमुख शाखासंघटक ,सर्व अंगीकृत संघटना,आणि अनेक शिवसैनिक उपस्थितीत होते.







