देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : भाजपा महायुतीचा आज (दि.५) शपथविधी सोहळा सायंकाळी आझाद मैदान इथं पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

 

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यात शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणवीर सिंग, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, अमित शाह, नितिश कुमार, योगी आदित्यनाथ, निर्मला सितारामण, ज्योतिरादित्य शिंदे, अनिल अंबानी, रणबीर कपूर, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, सुनिल तटकरे, आसिष शेलार, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

संगीतकार अजय अतुल यांनी आपल्या अनेक गाण्यांचे सादरीकरण केलं. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं आगमन झालं तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला. शपथविधी सोहळ्याची सुरुवात पोलीस बँडच्या वतीनं राष्ट्रगीतानं झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीताचं सादरीकरण झालं.

 

राज्यभरातून या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने हजर होते. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कुठे पेढे, तर कुठे फटाके वाजून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here