महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने १० कोटींचे सोने केले जप्त; सहा जणांना अटक

mumbai-airport
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फूड कोर्टात काम करणाऱ्या तीन कर्मचारीच सोने तस्करी करत असल्याची बाब उघडकीस आली असून, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने १० कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी विमानतळावरील फूड कोर्टात काम करणाऱ्या तिघांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

गेल्या दोन दिवसांत डीआरआय मुंबईने सुमारे ३६ किलो तस्करी केलेले सोने जप्त केले होते. ज्यामुळे तस्करी करणाऱ्या मंडळींना मोठा धक्का बसलाय. विमानतळावर विविध पदांवर काम करणाऱ्या 3 जणांसह 6 जणांच्या अटकेने सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे.

 

मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला सोने तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. विमानतळावरील फूड कोर्टात काम करणारेच त्यात सहभागी असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या एक सिंडिकेट आंतरराष्ट्रीय वाहतूक प्रवाशांकडून सोने मिळवून ते विमानतळाबाहेर पोचविण्याच्या काम करत होती. ही माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाळत ठेवली. तस्करीच्या सोन्याच्या दोन खेपा विमानतळाबाहेर वितरित केल्या जात असताना अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं. त्यानंतर सोन्याची डिलिव्हरी करणाऱ्या विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना आणि तीन रिसिव्हर्सनाही अटक करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ८ पाउचमध्ये मेणाच्या स्वरूपात सोन्याच्या धुळीचे २४ अंडाकृती आकाराचे गोळे सापडले. तपासणी करताना ९.९५ कोटी रुपयांचे १२.५ किलो (नेट वजन) सोने जप्त करण्यात आले. तर ९.९५ कोटी रुपये किमतीचे मेण स्वरूपात १२.५ किलो सोन्याची धूळ जप्त करण्यात आली होती. सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार सर्व ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here