
भडगाव (प्रतिनिधी मनिष सोनवणे) : नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतुन भडगाव तालुक्यातील वाचनालय व शाळांना ६ संगणक व ५ पोडीयम, इलेक्ट्रॉनिक्स डेस्क असे साहित्य वाटप करण्यात आले. भडगाव येथील नगर परीषदेच्या माजी नगरसेविका योजना दत्ताञय पाटील यांच्या हस्ते या वस्तुंचे वाटप करण्यात आले. हा वस्तु वितरणाचा कार्यक्रम भडगाव येथील कै. डाॅ. पुनम विजयराव पवार माध्यमिक विदयालयात सकाळी आयोजीत करण्यात आला होता.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष संजय पाटील, नाजीम शेख, डी, डी,पाटील , व्ही आर महाजन यांचेसह जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक शाळा, वाचनालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या शाळा व वाचनालयांना दिलेले संगणक व इलेक्ट्रॉनिक्स डेस्क ( पोडीयम ) वाटप केलेले पुढीलप्रमाणे आहेत. यात कै. डॉ. पुनम विजयराव पवार माध्यमिक विद्यालय भडगाव १ इलेक्ट्रॉनिक्स डेस्क,( पोडियम ), माध्यमिक विद्यालय शिंदी. इलेक्ट्रॉनिक्स डेस्क, (पोडियम) , गुलाबराव जगन्नाथ सोनवणे माध्यमिक विद्यालय कोठली. इलेक्ट्रॉनिक्स डेस्क, (पोडियम), प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव तालुका भडगाव. इलेक्ट्रॉनिक्स डेस्क, (पोडियम ) , आप्पासाहेब पुंडलिक काळू पाटील माध्यमिक विद्यालय पिंपरखेड. इलेक्ट्रॉनिक्स डेस्क (पोडियम ), ॲग्लो उर्दू हायस्कूल भडगाव. १ संगणक , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडगाव .संगणक , माध्यमिक विद्यालय वाडे. तालुका भडगाव. १ संगणक, नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय भडगाव वाडे . १ संगणक, योजना दत्तात्रय पाटील. माजी नगरसेविका भडगाव. १ संगणक असे नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून वाटप करण्यात आलेले आहेत.
या वस्तु मिळाल्याने जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक शाळा, वाचनालयाचे पदाधिकारी, पालक, नागरीकांनी आमदार सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहेत.






