पाईप चोरी प्रकरणात मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करावे – अशोक लाडवंजारी यांचे निवेदन

अशोक लाडवंजारी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहर मनपा अंतर्गत क्षेत्रात व कार्यालयातही पाईप लाईन चोरीबाबत तसेच मनपा नगररचना विभागातही शहरातील वेगवेगळ्या भागातील पोलीस स्टेशन व लाचलुचपत विभागामार्फत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पाईपलाईन चोरी प्रकरणात फक्त राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी माजी लोकप्रतिनिधी व भंगार विक्रेते यांनाच टार्गेट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची भावना जनतेची असून, या प्रकरणार सत्ताधारी पक्षातील अनेकजण तसेच मनपाचे तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार होवून ही चोरी करण्यात आली आहे.

 

दोन दिवसांपूर्वी मनपामध्ये बांधकाम परवानगी व इतर कामांसाठी ३० हजार रुपये लाच स्वीकारतांना मनपा इंजिनिअर यांना पकडण्यात आले. फक्त एकाच जणाविरुध्द गुन्हा दाख करण्यात आला परंतु उच्च अधिकाऱ्यांनाही अशा प्रकरणातील हिस्सा पोहचवला जातो. या दोन्ही घटनेत विशिष्ट व्यक्तींना अडकवण्यासाठी व मर्जीतील लोकांना वाचविण्यासाठी प्रकरण थंड बस्त्यात ठेवून पध्दतशीरपणे प्रयत्न सुरु केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अशोक सीताराम लाडवंजारी यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here