उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय एरंडोल व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज (दि.१२) जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार मनीष कुमार गायकवाड-( प्रान्त)उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हस्ते बाल विवाह प्रतिबंध अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
बाल विवाह प्रतिबंध कायदा -२००६ ची चळवळीत बाल विवाह थांबविणे व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच पहिले प्रबोधन, प्रतिबंधन व जन जागरूकता ह्या प्रमाणे प्रत्येक गावात पालन करने आणि बाल विवाह प्रतिबंधाकरीता दक्षता समिति बनविण्यात येणार आहे. गाव, ब्लॉक स्तरावर व प्रत्येक १५ दिवसानी आराखड़ा घेण्यात येईल असे मनीष कुमार गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.
त्याच प्रमाणे जितेंद्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिज़न इंडिया धरणगांव यांनी आपले अनुभव सांगितले व आम्ही सर्व मिळून बाल विवाहासारखे समाजातील व्हायरसला मात देऊ शकतो व आपल्या पदाचा खरा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे इवाक कॅपेनचे उद्घाटन करण्यात आले व गुड़ टच बॅड टच या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
वर्ल्ड व्हीज़न इंडियाच्या माध्यमातून शपथविधी करण्यात आला. तसेच हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. उपस्थित सर्व लोकांनी हस्ताक्षर करुंन बालविवाहाला प्रतिबंध करण्याचे वचन दिले. या कार्यक्रमात तिन्ही तालुका धरणगांव, पारोळा व एरंडोलचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक , महिला व बाल विकास अधिकारी, सीडीपी व समस्त पोलिस पाटील, सरपंच, वर्ल्ड व्हीज़न इंडियाची समस्त टीम आदि उपस्थित होते.







