नागपूर (संपादक सुनिल पाटील) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कर्मभूमीत दाखल झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक, संजय सावकारे, अशोक उईके, आशिष शेलार, आकाश फुंडकर आणि जयकुमार गोरे आदी आमदारांचा समावेश आहे.
महायुतीचे घटक पक्ष शिवसेनेचे संजय राठोड, प्रकाश अबिटकर, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि दत्ता भरणे या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.







