ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप भाई व प्रमोद टाले यांच्या आदेशानुसार परभणी शहरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सविधान यांच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आल्याबद्दल ठाणे कोर्ट नाका शासकीय विश्रामगृहाच्या येथे घोषणा देवून निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी मीना अलिंग, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी मंगला गाडे, कल्याण अल्पसंख्याक शहराध्यक्ष महिला आघाडी शबनम मेहरू निसार अल्मास शेख, मुरबाड महिला आघाडी आशा गंभीरराव, कांता पतंगराव, ठाणे शहर महिला आघाडी सुचित्रा स्वामी, रोहिणी पवार, ठाणे शहर महिला आघाडी महासचिव राजा चव्हाण, ठाणे शहर प्रभारी जमदाडे, ठाणे जिल्हा महासचिव महेंद्र पवार, ठाणे जिल्हा सचिव या सर्व पदाधिकाऱ्यांनी घोषणा देवून जाहीर निषेध व्यक्त केला.







