धरणगांव तालुक्यात बालविवाह प्रतिबंध अभियानाचे उदघाटन संपन्न

बालविवाह

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय एरंडोल व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : आज (दि.१६) जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद व मनीष कुमार गायकवाड (प्रान्त) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महेन्द्र सूर्यवंशी -तहसीलदार धरणगांव हांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.

 

बाल विवाह प्रतिबंध कायदा -२००६ ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे व लोकांमध्ये जन जागृती निर्माण करने व ज्या गावातील लोक बाहेरगावी कामाला जातात, ज्या बालकांनी शाळा सोडली असेल किवा अतिगरीब कुटुंबांकड़े जास्त लक्ष देणे व त्यांना जागृत करणे त्याच प्रमाणे लोकांना शिक्षेबाबत सांगणे, असे काही ही घडले तर त्वरित रिपोर्ट करने. सौ. भावना भोसले -गट शिक्षा अधिकारी यांनी सांगितले की, बाल विवाहाचे मुख्य कारण की गावात उच्च शिक्षणाची कमतरता व त्यामुळे मुले शाळा सोडतात व बाल विवाहाला बळी पडतात.

 

त्याच प्रमाणे जीतेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड विज़न इंडिया धरनगांव यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा २००६ चे पालन कसे करता येईल व कोणतेही मुले हे बालविवाह ला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व १०९८ आणि ११२ हेल्पलाइन वर कॉल करणे व कार्यक्रमाचा आराखड़ा याबद्दल आपल्या मनोगतात सांगितले आपले अनुभव सांगितले व आम्ही सर्व मिळून बाल विवाह सारखे समाजाचे व्हायरसाला मात देऊ शकतो. गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ. संजय चौहान -तालुका धरणगांव यांनी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी राबवित असताना बाल विवाहाबद्दल आशा सेविका यांच्या माध्यमाने जागृत करणार असल्याचे सांगितले. यावेळी इवाक कॅम्पेनचे उद्घाटन करण्यात आले.

 

वर्ल्ड व्हीज़न इंडियाच्या माध्यमाने शपथ देण्यात आली. शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकांनी हस्ताकक्षर करुन वचन दिले. वर्ल्ड व्हीजन इंडियाच्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते सर्व आशा सेविकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमात धरणगांव तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व टीम, पोलिस उप निरीक्षक अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सीडीओ, वर्ल्ड व्हीज़न इंडियाची समस्त टीम व धरणगांव तालुक्यातील आशा संयोगनी व सुपरवाइजर मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here