धुळे (उपसंपादक प्रशांत सुर्यवंशी) : भर दिवसा अपहरण करून मस्साजोगचे लोकप्रिय सरपंच व मराठा समाजाचे कार्यकर्ते स्वर्गीय संतोष देशमुख यांची नियोजित कट रचून अतिशय अमानवीय,निर्घृण हत्या, करण्यात आली त्याबाबत आरोपींना कठोर शिक्षा व सदर गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे देण्याबाबत मराठा समाज धुळे जिल्हा व छावा मराठा संघटना यांच्यावतीने निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून नियोजित कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. ज्या आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींची तसेच अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचे मोबाईल लोकेशन सीडीआर काढून योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन मराठा समाजाला न्याय देण्यात यावा अन्यथा लोकशाही व प्रशासनावरचा जनतेचा विश्वास उडल्या शिवाय राहणार नाही, तसेच संतोष देशमुख यांच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि मराठा समाजाला न्याय द्यावा,अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.समाजाला घातक अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी सकल मराठा समाज धुळे जिल्हा व छावा मराठा संघटना यांच्यावतीने करण्यात आली आहे.
सदर निवेदन सोमवारी (दि.१६) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी सुधाकर बेंद्रे, भोलाभाऊ वाघ, भानुदास बगदे, राजेंद्रदादा काळे, संदीपभैया पाटोळे, विनोदभाऊ जगताप, वामनतात्या मोहिते, गोविंदकाका वाघ, किशोरकाका वाघ, हेमंतभाऊ भडक, संदीपदादा सूर्यवंशी, कैलासभाऊ वाघारे, महेशभाऊ गायकवाड , सुनीलभाऊ ठाणगे , आबासाहेब कदम, दीपकभाऊ रवंदळ, संतोषदादा लकडे, प्रफुल्लदादा माने, मोतीलाल भाऊ मराठे, उल्हासभाऊ पाटील, वीरेंद्रभाऊ मोरे, आशिषभाऊ मराठे, बाळासाहेबभाऊ ठोंबरे, भूषणभाऊ बागुल, राजेंद्रभाऊ सरोदे, ज्ञानेश्वरभाऊ मराठे, ॲडवोकेट रवींद्रभाऊ पवार व सौ अश्विनी रवींद्र पवार संस्थापक अध्यक्ष शिवाज्ञा स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर उपस्थित होते.







