भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे मातीच्या रस्त्यावर खूप चिखल होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यात सध्या कोरोनाचे सावट गावात आहेच. आठवड्यातून एक दिवस गावात बाजार भरतो, त्या दिवशी गावातील तसेच आजूबाजूचे खेड्यावरील लोक गावात त्यांचा भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी गावात येतात. त्या ठिकाणी जायला रस्ता खूप खराब आहे. डॉ रमाकांत पाटील पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार रस्ता दुरुस्ती साठी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायततिने दुर्लक्ष केलं गेलं. शेवटी गावातील डॉ .रमाकांत प्रकाश पाटील यांनी स्वखर्चाने 8 ट्रॅक्टर मुरुम आणला व तो रस्त्यावर टाकून त्याला व्यवस्थित सपाटीकरण करण्यात आले. आता बाजारात जायला गावातील व गावाबाहेरील लोकांना व शेतकऱ्यांना रस्त्याचा खूप फायदा होईल.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र डॉ. रमाकांत पाटील यांनी स्वखर्चाने कुऱ्हा पानाचे येथील बाजारपेठ रस्ता केला







