कामगार नेते अभिजित राणे यांनी सेवा कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी उद्योगमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई (हितेश मिस्त्री) – आज दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी विख्यात कामगार नेते अभिजित राणे महासचिव संस्थापक धडक कामगार युनियन अध्यक्ष सेवा (सिकॉम एम्प्लॉएज वेलफेअर अससोसिअशन) यांनी सेवाचा कर्मचाऱ्यांचा समस्या व प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी गोरेगाव सिद्धार्थ नगर येथील प्रबोधन क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्मानीय नामदार सुभाष देसाई यांची भेट घेतली
सदर भेटी मध्ये सिकॉम् कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन उद्योग मंत्र्यांनी दिले सदर बैठकीत धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष व सेवाचे उपाध्यक्ष ॲड नारायण पनीकर, सेवाचे महासचिव श्रीमती राजश्री परब सचिव प्रांजल अग्रवाल व यशवंत खेडकर प्रमोद चव्हाण कार्यकारणी सदस्य सेवा व धडक माथाडी जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनय डोळस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here