जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : एअरगन बाळगत दहशत माजवणाऱ्या शुभम अनंता राउत (वय २१, रा. भगवाचौक, सुप्रिम कॉलनी, जळगाव) या तरुणास शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सुप्रीम कॉलनी परिसरात शुभम हा अग्निशस्त्र घेऊन दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, छगन तायडे, गणेश ठाकरे, शिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने सुप्रीम कॉलेज जात शुभम राऊत याची हंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्ट्यासारखे दिसणारी एअरगन मिळून आली.
शुभम याला विश्वासात घेवुन चौकशी केली असता जळगाव शहरातील तायडे गल्लीत राहणारा बंटी तायडे याच्याकडे एक पिस्टल दिली असल्याचे त्याने सांगितले. बंटी तायडेचा लागलीच शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. दरम्यान पंचांनसमक्ष त्याच्या घरातून एक गावठी बनावटीची पिस्टल मिळुन आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधीकारी संदीप गावीत आदी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







