पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालक तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पीडितेच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाकडे सदार मुलगी शिकवणीसाठी जायची. आरोपी तिला अश्लील चित्रफीत दाखवायचा. तसेच “तू अभ्यास करताना चुकली तर तुला शिक्षा देईल,’ असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा.
घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती आईला नुकतीच दिली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी तरुणाचे वय २५ वर्षे असून, त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.







