अफगाणिस्तानातील महिलांसाठी तालिबानचा नवा फतवा; घराच्या खिडक्या बंद करा

तालिबान

काबूल (वृत्तसंस्था) : येथे तालिबानने महिलांविरोधात नवा फतवा जारी केलाय. या आधी ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेले तालिबान महिलांच्या हक्कांवर बंदी घालत आहे. युनायटेड नेशन्सनेही तालिबानच्या महिलांबाबतच्या धोरणांवर आक्षेप व्यक्त केलाय. तालिबानने महिलांना काम करण्यास बंदी घातलीय. तसेच मुलींना आणि महिलांना प्राथमिक शिक्षण संस्था, पार्क असा सार्वजनिक ठिकाणी येण्या-जाण्यावर मनाई करण्यात आलीय. आता नव्या फतव्यानुसार अफगाणिस्तानमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये खिडक्या नसल्या पाहिजेत, असा अगळावेगळा फर्मान तालिबानने का काढला.

 

महिला घराबाहेर पाहू नयेत, यासाठी तालिबान सरकारच्या सर्वोच्च नेत्यानं आदेश जारी केलाय. यात त्यांनी म्हटलंय की, महिलांना पहिल्यानंतर अश्लील हावभाव आणि कृत्य होतील. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी X वर या संदर्भात एक पोस्ट जारी केलीय. नव्या घरात घरातून अंगण, स्वयंपाक घर, शेजारच्या घराजवळील विहीर किंवा महिलांच्या उपयोगात येणारी अशी कोणतीही जागा दिसणार नाही, अशा ठिकाणी खिडक्या करू नयेत. स्वंयपाक घरात काम करताना, अंगणातून जाता येता, किंवा विहिरीवरून पाणी घ्यायला जाताना महिलांना पाहून लोक अश्लील कृत्य करू शकतात किंवा हावभाव करतील, त्यामुळे घरातील खिडक्या असतील त्या बंद करा. किंवा नवं घर बांधताना खिडक्या करू नये, असं मुजाहिद यांनी आपल्या आदेशात म्हटलंय.

 

तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार,पालिका अधिकारी आणि इतर संबंधित विभागही बांधल्या जाणाऱ्या नवीन घरांवर लक्ष ठेवतील. या घरांमध्ये शेजाऱ्यांच्या घराच्या दिशेने खिडक्या असतील तर त्या उघडू नयेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. जर कोणत्या घरात आधीच शेजाऱ्याच्या घराकडे खिडक्या असतील किंवा दार असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांनी खिडक्या बंद कराव्यात. घर मालकांना आपल्या घरात असलेल्या खिडक्यांकडे भिंत बांधावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here