डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपूर येथील कराड नाका भेटीला ८७ वर्षे पूर्ण; आमदार राजाभाऊ खरे यांचा नागरी सत्कार

आमदार राजाभाऊ खरे

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपूर येथील कराड नाका भेटीला ८७ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने मोहोळ तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खरे यांचा आपल्या जन्मठिकाणी पंचशील मंडळ पंढरपूर यांचे वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते त्यांचे हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंढरपूर पंचशील मंडळाचे वतीने कुमार ढवळे यांचे प्रमुख भाषण झाले.

 

यावेळी राजाभाऊ सरवदे , सुधीर मागाडे सर , मंडळाचे अध्यक्ष आर.पी. कांबळे,जितेंद्र बनसोडे यांची तर आमदार राजाभाऊ खरे यांनी सत्काराला उत्तर देताना माझा जन्म या भुमी मध्ये झाला तिथल्या भुमीत बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी काही कमी पडू देणार नाही. असे सांगितले. यावेळी आंबेडकरी समाजातील हजारो बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन पाटोळे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन कुमार ढवळे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here