डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

crime
file photo

सातारा (प्रतिनिधी) : रुग्णालय व्यवस्थापनाच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय अशोक नलावडे (वय-२८) या रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या चेअरमनवर व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला अक्षयच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉ. भूषण पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. अक्षयच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज (दि.२) सकाळी पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.

 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले आणि रुग्णालसमोर ठिय्या मांडला. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरला अटक केली आहे. त्यानंतर सकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले असले, तरी हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here