अवैध दारू विक्रेत्यावर दहिवडी पोलिसांची कारवाई; सहा ठिकाणी छापे, अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू

माण (प्रतिनिधी निलेश अडसूळ) | माण तालुक्यातील विविध गावांमध्ये बेकायदेशीर पणे चालणाऱ्या अवैध दारूविक्रीकर दहिवडी पोलिसांनी धडक कारवाई केली या मध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणे टाकलेल्या छाप्यात एकूण 11 हजार 800 रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात अलीअसून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दहिवडी, गोंदवले, मलवडी, शिंगणापूर आणि महिमानगड या गावाच्या हद्दीत परवानगीशिवाय दारू विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापे टाकले या मध्ये मलवडी ऋषिकेष विजय साळुंखे यांच्याकडून 880 रुपये, शिंगणापूर मध्ये बबन विष्णू चव्हाण यांच्या कडून 880 रुपये, गोंदवले बुद्रुक अंकुश तुकाराम मदने यांचा कडून 460 रुपये व सुनील किसन जाधव यांचा कडून 3860 रुपये किमतीची दारू, राननंद येथे अर्जुन चंद्रकांत जाधव यांच्या कडून 800 रुपये तर महिमानगड मध्ये मारुती रामचंद्र सुतार यांच्याकडून 5 हजार रुपये किमतीची देशी दारू असा एकूण 11800 रूपांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला संशयिता विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात सहा वेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत
कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरक्षक भाऊ साहेब गोसावी, साह्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगगे , मोहन हांगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे , पोलीस हवालदार रवींद्र खाडे, काळेल , राम गाडवे, तनुजा खाडे , तशेच पोलीस शिपाई महेश सोनवलकर ,गणेश खाडे , संतोष वीरकर, अजिनाथ नरबट , निलेश कुदळे आणि श्रीमती दुबळे ह्यांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here