सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : मंगळवेढा सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरने रस्त्यावरून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक देऊन गोरख मल्हारी बोडरे.(वय ३६ राहणार अर्धनारी तालुका मंगळवेढा) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे अज्ञात टँकर चालकावर दोघांना दाखल झाला आहे.
दरम्यान अपघातानंतर टँकर चालक फार झालेला आहे पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी दहा जानेवारीच्या पहाटे तीन वाजता मंगळवेढा ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर ब्रह्मपुरी सिरसट वस्तीजवळ ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रमांक ८७८९ याला सिमेंट वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टँकर क्रमांक ४०६७ या वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर चालक गोरख बोडरे याला गंभीर जखमी केले व त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची फिरत धुळापा तुकाराम कोकरे यांनी दिलेल्या अज्ञात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
दरम्यान टँकर चालकाचा वेग एवढा मोठा होता की ट्रॅक्टरच्या इंजिनचे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन रोडच्या खाली जाऊन पट्टी झालेली दिसून येत आहेत तसेच दुसऱ्या पाठीमागे टेलर ला जोरात ची धडक दिल्याने टँकरसह ट्रॅक्टर रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने चित्र होते.
या अपघाताचे वृत्त समजतात राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस पथक तात्काळ दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक गणपत माने सहाय्यक फौजदार दत्तात्रय घंटे पोलीस आमदार सुनील घोळसगावकर दत्तात्रेय बोरकर आधीचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रस्त्यावरचे वाहतूक सुरळीत केली त्याचबरोबर इजगाव टोलनाक्यावरील हायवे पेट्रोलिंग टीम मधील कंट्रोल रूम अधिकारी धनाजी माने रोड पेट्रोलिंग अधिकारी संतोष नाईकवाडी प्रदीप व्हरडे दत्तात्रय घुले मदतनीस अमीर पटेल व ॲम्बुलन्स टीम यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या साह्याने रस्त्यामधील अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला.







