पंढरपूर, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसन गाव विकासासाठी बैठक संपन्न

पंढरपूर

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : आज (दि. १६ जानेवारी) सकाळी ११ वाजता बैठक संपन्न झाली. या बैठकीत पंढरपूर, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसन गावे, गावांना महसुली दर्जा मिळणे, शेतकरी वहिवाट रस्ता नियमित करणे, पुनर्वसन प्लाॅट धारकांचे नियमित करणे, तसेच प्रकल्प ग्रस्त गावांना सोईसुविधा देणे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिकारी यांना पुनर्वसनचे प्रकरण निकाली काढण्यात यावेत अशा बैठकीत सुचना देण्यात आल्या..

 

या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील खासदार, अभिजीत पाटील आमदार,मा. समाधान आवताडे आमदार व अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, सुशांत बनसोडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर, सचिन ईथापे उपविभागीय आधिकारी पंढरपूर, तहसिलदार पंढरपूर, उप मुख्य कार्यकारी आधिकारी ग्रा.पं. जि.प सोलापूर व मंडल आधिकारी, तलाठी व पुनर्वसन गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here