पुण्यात डिलीव्हरी बॉयने केल्या चौदा घरफोड्या

घरफोड्या

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) – ऑनलाईन ऑर्डरनुसार खाद्यपदार्थ घरपोहोच पोहोचवणार्‍या मुलाचा (डिलीव्हरी बॉय) शर्ट घालून अनेक सोसायट्यांमधील बंद सदनिकांची पाहणी केली. त्यानंतर, संधीचा फायदा घेऊन घरफोडी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

 

त्याचा साथीदार असलेल्या सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ८६० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, १५० हिरे, दुचाकी आणि दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३५, बालाजीनगर, धनकवडी), सराफ व्यावसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (वय ३९) यांना अटक करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here